भाजीपाल्यासोबत डाळही सामान्यांच्या अवाक्याबाहेर; आता मसूर डाळीवरच मदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:19 AM2021-07-23T04:19:24+5:302021-07-23T04:19:24+5:30
पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात तेजी लोकमत न्यूज नेटवर्क जालना : एकीकडे इंधन दरवाढीने सर्वच किराणा मालाचे भाव वाढले आहेत. त्यात ...
पावसामुळे भाजीपाल्याच्या दरात तेजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एकीकडे इंधन दरवाढीने सर्वच किराणा मालाचे भाव वाढले आहेत. त्यात विशेष करून डाळींच्या भावात तेजी-मंदी सुरू आहे.
दररोजच्या जेवणामध्ये डाळींचे आणि भाज्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळे जीवनसत्त्व या दोन्ही वस्तूंमधून मिळतात. त्यामुळे या दोन्ही बाबी नित्याची गरज बनली आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने भाज्यांची आवक घटली आहे. याचा परिणाम काही अंशी भाज्यांच्या भाववाढीवर झाला आहे. डाळींचे दर कमी होण्याचे नाव घेत नसून, केवळ मसुराची डाळ हीच सध्या शंभरीच्या आत असल्याचे दिसून येत आहे.
म्हणून डाळ महागली...
n मध्यंतरी घटलेले उत्पादन आणि वाहतुकीचा खर्च यातून डाळींचे भाव वाढले आहेत. हे कमी होण्याचे नाव घेत नसून, शंभर रुपयांपेक्षा अधिकच जास्तीचे पैसे हे एका किलोसाठी मोजावे लागत आहेत.
n केंद्र सरकारने नवीन धोरणानुसार डाळींचा साठा मर्यादित केला आहे. याचाही परिणाम भावात कमी-अधिक होण्यामध्ये झाला आहे.
म्हणून भाजीपाला कडाडला
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सततचा पाऊस यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे भाजींच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. ही दरवाढ लगेचच खाली येईल, अशी शक्यता घाऊक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्यांचे हाल
डाळी आणि भाज्यांमध्ये अचानक झालेली दरवाढ ही परवडणारी नाही. कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, त्यात ही दरवाढ डोकेदुखी ठरत आहे. - माया लोंढे
भाववाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. विशेष करून भाज्या आणि डाळी या जेवणातील अविभाज्य घटक आहेत. सरकारने हे दर स्थिर ठेवावेत. - मंदा गायकवाड