जिल्ह्यात पाच कोटी रूपयांची तूर खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:57 AM2018-03-08T00:57:34+5:302018-03-08T00:57:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर एक हजार शेतक-यांकडून ७ मार्चपर्यंत ५ कोटी रूपयांची तूर खरेदी करण्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर एक हजार शेतक-यांकडून ७ मार्चपर्यंत ५ कोटी रूपयांची तूर खरेदी करण्यात आली. जालना सेंटरवरील १५० शेतक-यांना ७२ लाख रूपये वगळता इतर ९२३ शेतक-यांना तुरीच्या पैशांची प्रतिक्षा लागून आहे. मात्र महिना उलटूनही शेतक-यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत नसल्याने शेतक-यांत नाराजी आहे. तुरीचे पैसे कधी जमा होणार, अशी विचारणा शेतक-यांतून होत आहे.
जिल्ह्यातील जालना, मंठा, परतूर, भोकरदन, अंबड आष्टी, तीर्थपुरी आणि जाफराबाद आदी आठ केंद्रांवर १ हजार शेतक-यांकडून ९ हजार ३७३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तूर खरेदीच्या आठवड्यानंतर शेतक-यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात येईल असे नाफेडकडून सांगण्यात आले होते. शेतकºयांतून ओरड झाल्यानंतर नाफेडने पहिल्या टप्प्यात केवळ १५० शेतकºयांना ७२ लाख रूपये वितरीत केले. मात्र मोठ्या प्रमाणात शेतक-याकडून तूर खरेदी होत असताना पैसे मिळण्यास अडचणी येत आहे. त्यामुळे शेतक-यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. नाफेडच्या अधिका-यांनी लक्ष देऊन तुरीचे पैसे बँक खात्यात वर्ग करण्याची मागणी होत आहे.
आठवडाभरात
रक्कम जमा होणार
पहिल्या टप्यातील जालना सेंटरवरील १५० शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरीत ९२३ शेतक-यांचे बँक खात्याची पडताळणी पूर्ण झाली असून आठवड्याभरात शेतक-यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी गजानन मगरे यांनी सांगितले.