दुभती जनावरे खरेदींचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:55 AM2019-01-19T00:55:59+5:302019-01-19T00:58:21+5:30
दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी करण्याची ही योजना होती. मात्र २०१७ मध्ये सुरू झालेल्या योजनेला दोन वर्षानंतर का होईना मुहूर्त लागला आहे.
जालना : दुष्काळावर मात करण्यासाठी शेतक-यांना पुरक उद्योग म्हणून दूग्ध व्यवसाय करण्यासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने प्रायोगिक तत्वावर दुभती जनावरे अर्थात गायी-म्हशी तसेच २० शेळीचा गट आणि दोन बोकड यासाठी ५० टक्के अनुदानावर खरेदी करण्याची ही योजना होती. मात्र २०१७ मध्ये सुरू झालेल्या योजनेला दोन वर्षानंतर का होईना मुहूर्त लागला आहे.
दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या पुढकाराने दुभती जनावरे देण्याची ही योजना मराठवाडा पॅकेजमधून करण्यासाठीची योजना जाहीर केली होती. त्यात संबंधित शेतकºयाने एक गाय, एक म्हैस यासाठी अनुक्रमे दोन लाख १० हजार रूपये लागणार आहेत. या गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी एक खरेदी समिती नेमण्यात आली आहे. या समितीने मंजूरी दिल्यावरच संबंधित शेतकºयाला हे ५० टक्के अनुदान आणि ५० टक्के त्यांची स्वत:ची गुंतवणूक अशा प्रकारची ही योजना होती.
मात्र मध्यंतरी या योजनेवरून बरेच राजकारण झाले. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडली. परंतु सध्या दुष्काळ असल्याने आणि शेकºयांकडे दुभती जनावरे खरेदीसाठी मुबलक पैसा नसल्याने त्या शेतकºयांना बँकांनी गाई- आणि म्हशीसाठी त्यांना साधारपणे दोन लाखाचे अर्थसाह्य करावे अशा सूचना राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी बँक अधिकाºयांना दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा बँक मेळावा घेण्यात आला होता.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, मुख्याधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्याधिकारी मुकीम देशमुख, पंडित भुतेकर, संतोष मोहिते यांच्यासह जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक इलमकर, डॉ.एस.पी. गुडे, डॉ. अमितकुमार दुबे यांच्यासह अन्य अधिकाºयांची उपस्थिती होती.यावेळी शेतकºयांनी बँकेच्या अधिकाºयांना भेटण्यासाठी मोठी गर्दी सभागृहात केली होती.
बंँकांनी सहकार्य करावे
सध्या दुष्काळ असल्याने शेतकºयांसाठी ही योजना संजीवनी ठरू शकते. सध्या शेतकºयांकडे दुभती जनावरे खरेदीसाठी शिल्लक पैसा नसल्याने बँकांनी त्यांना कर्ज उपलब्घ करून द्यावे, त्यासाठी बँकांनी सहकार्य करण्याचे निर्देश राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले. एकूणच संपूर्ण जिल्ह्यासाठी ही योजना एक पथदर्शी ठरणार आहे असेही खोतकर यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.