नाफेडची तूर खरेदी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:48 AM2018-03-01T00:48:08+5:302018-03-01T00:48:50+5:30

गतवर्षीच्या तुलनात येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

The purchase of Pigeon pea by Nafed decreased | नाफेडची तूर खरेदी घटली

नाफेडची तूर खरेदी घटली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : गतवर्षीच्या तुलनात येथील नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर खरेदीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परराज्यातील तूर न आल्यामुळे यावर्षी ही घट नोंदली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.
यावर्षी तालूक्यातील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर केवळ ५२३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, हिच तूर मागील वर्षी २८ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. अचानक ही घट झाल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.
परतूर तालूक्यातील नाफडच्या तूर खरेदी केंद्रावर मोठया प्रमाणात तूर आल्याने चांगलाच गोंधळ उडाला. गोडाउन, वेअर हाउस मध्ये ही खरेदी केलेली तूर ठेवायला जागा नव्हती. खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगाच रांगा होत्या तर खरेदी विना पंधरा पंधरा दिवस तूर केंद्रावर पडून होती. या तूरीची मोठी परवड झाली. मात्र या वर्षी हिच तूर अचानक घटली आहे. आजपर्यंत शासनाने सुरू केलेल्या नाफेडच्या खरेदी केंद्रावर केवळ ५२३ क्विंटल तूर आली आहे. ही तूर ७१ शेतक ं-यांनी आणली आहे. तर यावर्षी खाजगी व्यापा-यांकडे १६ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मागील वर्षी हिच तूर नाफेडच्या केंद्रावर २८ हजार २०० क्विंटल खरेदी करण्यात आली होती. तर खाजगी व्यापा-यांकडे ४० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली होती. यावर्षी नाफेडच्या खरेदी केंद्रावर तूर येण्याचे प्रमाण प्रचंड घटले आहे. गतवर्षीच्या २८ हजार क्विंटलच्या तुलनेत यंदा केवळ ५२३ क्ंिवटल तूर खरेदी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर्षी अचानक तूर घटल्याने नाफेडच्या केंद्रावर शुकशुकाट दिसत आहे.

Web Title: The purchase of Pigeon pea by Nafed decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.