कुशल कामगारांमुळेच दर्जेदार ‘पोलाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:38 AM2021-04-30T04:38:21+5:302021-04-30T04:38:21+5:30

संकटमोचक म्हणून ओळख असलेले घनश्याम गोयल, महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले योगेश मानधनी यांनीदेखील वेळोवेळी स्टील उद्योगावर आलेल्या संकटांशी अत्यंत ...

Quality 'steel' due to skilled workers | कुशल कामगारांमुळेच दर्जेदार ‘पोलाद’

कुशल कामगारांमुळेच दर्जेदार ‘पोलाद’

googlenewsNext

संकटमोचक म्हणून ओळख असलेले घनश्याम गोयल, महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून लाभलेले योगेश मानधनी यांनीदेखील वेळोवेळी स्टील उद्योगावर आलेल्या संकटांशी अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे जाऊन ते सोडविले आहे. पोलाद आणि भाग्यलक्ष्मी या दोन स्टील कंपन्यांची निर्मिती ही दोन दशकांपूर्वीची आहे. आपण स्वत: वडिलांनी घालून दिलेल्या उद्योगाच्या वाटेवर चालत आहोत. यामध्ये परिवारातील सदस्य आणि लहान बंधू विशाल अग्रवाल, काळानुरूप तंत्रज्ञानाची नाडी ओळखणारे संचालक नितीन काबरा, अनिल गोयल तसेच भारतीय परंपरा जपून काळानुरूप बदललेल्या उद्योगातही आपला आदर्श कायम ठेवणारे सुनील गोयल या सर्वांच्या मदतीने उद्योगाचा डोलारा उभारला आहे. त्यात जीवाला जीव देणारे कामगार आमच्याकडे असल्याने आजची आमची ही झेप यशस्वी होत आहे. कामगार आणि त्यांच्या कुटुंबाची आम्ही परिवारातील सदस्यांप्रमाणेच काळजी घेताे.

एकूणच स्टील उद्योगात नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. हे तंत्रज्ञान आत्मसात करताना त्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे असते. ट्रेनी इंजिनिअर्स आणि आयटीआय झालेल्यांना आज वेगवेगळ्या उद्योगांप्रमाणेच स्टील उद्योगातही मोठी मागणी आणि संधी आहे.

पोलाद आणि भाग्यलक्ष्मी या कंपन्यांमध्ये अभियंता असलेल्या युवतींनाही रोजगाराची संधी देण्यात आली आहे. या मुलीदेखील पुरुषांच्या तुलनेत कुठेच मागे नाहीत. त्यामुळे कामगारांचे हित आणि भविष्य हे कसे उज्ज्वल राहील, यावरच आपला भर असतो. तेवढ्याच तन्मयतेने कामगारही आमच्यावर विश्वास ठेवून उत्पादन आणि दर्जा राखत असल्यानेच आज स्टील उद्योगामध्ये एक स्वतंत्र ब्रॅण्ड म्हणून आम्ही उदयास आलो

आहोत.

- सतीश अग्रवाल,

संचालक पोलाद स्टील, जालना

०००००००००००

कायदे महत्त्वाचे

कामगार कल्याणार्थ शासन अनेक कायदे करत आहेत. परंतु सध्या कामगारांच्या हिताऐवजी भांडवलशाहीचे हित जपले जात आहे. याचा धोरणात्मक विचार केंद्र आणि राज्य सरकारने करून कामगारांना जास्तीतजास्त संरक्षण आणि अन्य लाभ कसा मिळेल, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारने गंभीर व्हावे.

- संजय देशपांडे

——————————-

पाठपुरावा गरजेचा

कामगारांसाठी कायदे आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी करताना यंत्रणांकडून दुर्लक्ष होत आहे. यासाठी सर्व कामगारांनी एकत्रित येऊन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच ५० टक्के का होईना वेतन आयोगासह सेवानिवृत्तीवेतन मिळाल्यास वृद्धापकाळात त्याचा लाभ होऊ शकतो.

- गाेविंद पाचपोर

———————————————————-

संघटन महत्त्वाचे

कामगार एकजूट असल्याशिवाय कुठल्याही मागण्या मान्य होत नाहीत. मग तो व्यवसाय खाजगी असो की, सरकारी किंवा निमसरकारी येथे कामगारांना नेहमीच दुर्लक्षिले जाते. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. या मागण्या अवाजवी नसाव्यात.

- गोविंद कळकटे

——————————————————-

संरक्षणाची गरज

कामगार हा देशाच्या प्रगतीत मोठा हातभार लावतो. आज संघटित आणि असंघटित असा कामगारवर्ग विखुरलेला आहे. त्यामुळे काेरोना काळ लक्षात घेऊन कामगारांसह त्यांच्या सर्व कुटुंबाची आरोग्य संदर्भातील जबाबदारी ही कंपनी व्यवस्थापनाने घेतल्यास मोठा दिलासा मिळू शकेल.

- शिवाजी तेलंग्रे

————————————————————

वेतनवाढ मिळावी

आदर्श कामगारांना केवळ पुरस्कार आणि सन्मानपत्र देऊन सरकारने थांबू नये. वेतनवाढ देताना आदर्श कामगारांचा विचार होऊन विशेष वेतनवाढीची तरतूद करणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे आदर्श शिक्षकांना जि.प.कडून वेतनवाढ मिळते, त्याच धर्तीवर सरकारने अन्य कामगारांनाही ती देण्याची गरज आहे.

- विजय देशपांडे

Web Title: Quality 'steel' due to skilled workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.