थंडी वाढल्याने रबीची पिके जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:17 AM2017-12-27T00:17:41+5:302017-12-27T00:17:51+5:30
तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रबीच्या पिकांना या थंडीचा लाभ झाला असून गहू, हरभरा व शाळू ज्वारी ही पिके चांगलीच बहरली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रबीच्या पिकांना या थंडीचा लाभ झाला असून गहू, हरभरा व शाळू ज्वारी ही पिके चांगलीच बहरली आहेत.
भोकरदन तालुक्यात यावर्षी खरीप पिकाचे नुकसान झाल्यामुळे परतीच्या पावसामुळे काही भागांत चांगला पाणीसाठा झाल्यामुळे शेतक-यानी हरभरा, गहू, मका, व शाळू ज्वारी या पिकांची पेरणी केली आहे. हरभ-याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आल्यामुळे मका लागवडीमध्ये घट झाली आहे तरी सुध्दा तालुक्यातील केदारखेडा, नळणी, रजाळा, कोपर्डा, निमगाव, राजूर, चांदई, बाणेगाव, थिगळखेडा, जवखेडा खुर्द, हसनाबाद या भागातील शेतकºयानी हरभ-याऐवजी शाळू ज्वारीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. पिके चांगलीच बहरली असून आठ ते पंधरा दिवसांमध्ये या भागातील ज्वारीचे पीक हे हुरडा पार्टीसाठी तयार होणार आहे.
चांदई एक्को परिसरात बाणेगाव तलावामुळे शेतकºयाच्या विहिरींना पाणी असल्यामुळे शाळू ज्वारीचे पीक चांगलेच बहरून आले आहे़ तर पिंपळगाव रेणुकाई, पारध, धावडा, वालसावंगी, आन्वा, जळगाव सपकाळ, भोकरदन, सिपोरा बाजार या परिसरात शेतक-यांनी मका टाळून हरभ-याला प्राधान्य दिले आहे.