माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या बंगल्यावार छापा, ED कडून झाडाझडती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 03:37 PM2021-11-26T15:37:11+5:302021-11-26T15:46:09+5:30

औरंगाबाद शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे येऊन सोमय्यांनी सेनेच्या माजी मंत्र्यावर आरोप केल्याचे भाजप-सेना वाद आणखी चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली होती

Raid on former minister Arjun Khotkar's bungalow in jalana, removal of trees from ED | माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या बंगल्यावार छापा, ED कडून झाडाझडती

माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या बंगल्यावार छापा, ED कडून झाडाझडती

Next
ठळक मुद्देसकाळी साडेआठ वाजल्यापासून खोतकर यांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात ईडीचं पथक झाडाझडती करत आहे. या पथकात एकूण १२ जण कार्यरत आहेत. आतमधून दरवाजे बंद करण्यात आले असून कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.

जालना - शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar ) यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदीविक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केला आहे (Kirit Somaiya On Arjun Khotkar's 100 cr scam ). तसेच आता ते कारखान्याची १ लाख कोटींची जवळपास २५० एकर जमीन बळकाविण्याच्या प्रयत्नात आहेत असा सनसनाटी आरोप भाजपच्या किरीट सोमय्या ( Kirit Somayya) यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. त्यानंतर, आज अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर ईडीने छापा टाकल्याची माहिती आहे. 

औरंगाबाद शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे येऊन सोमय्यांनी सेनेच्या माजी मंत्र्यावर आरोप केल्याने भाजप-सेना वाद आणखी चिघळला आहे. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली होती. त्यानंतर, सक्तवसुली संचालयाने आज अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर छापेमारी केली. येथे आज सकाळी साडेआठ वाजता ईडीचा छापा पडला. खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळेच जालन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतही ईडीकडून तपासणी सुरु करण्यात आली आहे. सकाळी साडेआठ वाजल्यापासून खोतकर यांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात ईडीचं पथक झाडाझडती करत आहे. या पथकात एकूण १२ जण कार्यरत आहेत. आतमधून दरवाजे बंद करण्यात आले असून कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये.

किरीट सोमैय्यांचे गंभीर आरोप

अर्जुन खोतकर यांच्या राम नगर येथील साखर कारखान्याचा व्यवहार असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली होती. तसेच, हा व्यवहार २०१२ ते २०२१ या दरम्यान झाला. दोन्ही ठिकाणाचे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या माध्यमातून अर्जुन खोतकर यांनी जवळपास १०० कोटींचा घोटाळा केला आहे. आता खोतकर हे कारखान्यास शेतकऱ्यांनी दिलेली जवळपास १ लाख कोटींची २५० एकर शेतजमीन ताब्यात घेण्याची तयारी सुरु आहे. माझ्याकडे संबंधित शेतकरी आणि काही व्यक्तींनी माहिती दिली, त्यावरून मी ईडी, राज्य सरकार आणि आता केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे, असेही त्यांनी सांगितले होते.

Read in English

Web Title: Raid on former minister Arjun Khotkar's bungalow in jalana, removal of trees from ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.