जालन्यात जुगार अड्ड्यावर छापा; ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:28 AM2019-02-15T00:28:16+5:302019-02-15T00:28:40+5:30
जालन्यातील शास्त्री मोहल्ला येथे एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारुन सात जुगाऱ्यांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यातील शास्त्री मोहल्ला येथे एका घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री छापा मारुन सात जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल दोन गोण्या पत्त्यांसह ८७ हजार ६८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शास्त्री मोहल्ला येथील गणेश रामभाऊ गोगडे यांच्या घरी जुगार अड्या सुरु असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली होती. माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने गोगडे यांच्या राहत्या घरी बुधवारी साडेबाराच्या सुमारास छापा टाकला. यावेळी गणेश गोगडे (रा.शास्त्री मोहल्ला), सुरेश दादाराव लाड (इतवारा गल्ली), अस्लम इब्राहिम कुरेशी ( कुचरवटा), नागेश सदाशिव कुसुल (शनीमंदिर परिसर), ज्ञानेश्वर नंदकिशोर कुठाळे (कपूर गल्ली ), शशांक अंबादास चिखलीकर(गवळी मोहल्ला) आणि राजकुमार चंद्रप्रकाश कपूर (शास्त्री मोहल्ला) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंग गौर, उपनिरीक्षक जयसिंह परदेशी, कैलास कुरेवाड, सुरेश गीते, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, हिरामण फलटणकर, विष्णू कोरडे, जकी पठाण यांनी केली. जुगार खेळतांना अनेकजण हातचलाखी करुन पत्त्यांवर काहीतरी खूण ठेवतात. यामुळे आर्थिक फसवणूक होण्याची भीती असते.
ही टाळण्यासाठी आरोपी गणेश गोगडे यांने प्रत्येक डावासाठी नवीन पत्यांचा वापर करण्यात येत होता. यामुळे तब्बल दोन गोण्या जुगाराचे साहित्य पोलिसांच्या हाती लागले. सर्व आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करून न्यायालयात उभे केले असता त्यांना जामीन मंजूर झाला.