राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच ठिकाणी छापे; दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 01:13 AM2018-07-10T01:13:25+5:302018-07-10T01:13:47+5:30

घनसावंगी तालुक्यातील घनसावंगीसह परिसरातील कुंभार पिंपळगाव, गोपीचंद नगर तांडा, चिंचोली आदी ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोमवारी धाडी टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी साडेसात हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

Raids in five places by state excise department; Liquor seized | राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच ठिकाणी छापे; दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पाच ठिकाणी छापे; दारू जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील घनसावंगीसह परिसरातील कुंभार पिंपळगाव, गोपीचंद नगर तांडा, चिंचोली आदी ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने सोमवारी धाडी टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी साडेसात हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.
या पथकात राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक राहुल गायकवाड, के एस घुनावत, डी. जी. आडे, सुनील कांबळे यांचा समावेश होता
मागील अनेक दिवसांपासून कुंभार पिंपळगाव परिसरात दारू विक्रीत वाढ झाली होती. त्यातच धामणगाव येथील महिलांनी दारू अड्ड्यावर थेट हल्ला करून दारूच्या बाटल्या फोडल्या तर गुणानाईक तांड्यावरील ग्रामस्थांनी दारुबंदी विभागाकडे गावात दारूबंदीची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकूणच या कारवाईमुळे परिसरातील अन्य दारूविक्रेत्यांविरूध्द देखील अशीच कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी टाकलेल्या धाडीत दोन ठिकाणी बनावट विदेशीदारू आढळून आली याबाबत दारूबंदी विभागाने कारवाई केलेली असून बनावट दारू विकणाऱ्यांवरही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे दारुबंदी विभागाकडून सांगण्यात आले आहे
ज्या भागात अवैध मार्गाने दारू विक्री चालू असेल तर अशा वेळेस आॅनलाईन तक्रार करता येते त्यासाठी टोल फ्री क्रमांक वर संपर्क करावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क च्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Raids in five places by state excise department; Liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.