जालना-जळगाव रेल्वे मार्गाला रावसाहेब दानवेंचा हिरवा कंदील, लवकरच सुरू होणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 11:16 AM2022-02-09T11:16:55+5:302022-02-09T11:17:04+5:30
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली आहे.
जालना :जालना व जळगाव जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना - जळगाव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील दाखविला असून, या मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे. सहा महिन्याच्या आत हे सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर कामासाठी निधी मंजूर केला जाणार असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
जालना व जळगाव येथे मोठी बाजारपेठ आहे. दोन्ही जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांना एसटी किंवा खासगी वाहनाने ये-जा करावी लागते. त्यामुळे व्यापाऱ्यांची मोठी गैरसोय होते. जालना ते जळगाव रेल्वे मार्ग व्हावा, अशी मागणी काही व्यापाऱ्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. या मागणीवर चर्चा करून दानवे यांनी या मार्गाला हिरवा कंदील दाखविला असून, या मार्गाचे सर्वेक्षण करण्याला मंजुरी दिली आहे.
त्यासाठी ४ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सहा महिन्याच्या आत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. हा मार्ग जालना, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्ग जाणार जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.