भोकरदन, जाफराबाद तालुक्यात बरसला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:58 AM2018-06-22T00:58:10+5:302018-06-22T00:58:10+5:30
भोकरदन परिसरात गुरुवारी सायं. ५ वाजेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन परिसरात गुरुवारी सायं. ५ वाजेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळपासून वातावरणात उकाडा जाणवत होता. त्यामुळे पाऊस येणार, असे वाटत होते. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान भोकरदन, कुभारी, फत्तेपूर, गोकुळ, पेरजपुर, नाजा, चोरहळ, विरेगाव, दानापूर, भायडी, तळणी इ. गावांमध्ये दमदार पाऊस झाला. दानापूर येथे पावसाचे पाणी घरात शिरल्याने तारांबळ उडाली होती.
जाफराबाद तालुक्यातील भारज बु. सह परिसरात २१ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे शेतक-यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करीत असलेल्या शेतक-यांना आज झालेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. या जोरदार पावसामुळे गावाजवळून वाहणारी सीतान्हाणी नदी दुथडी भरून वाहत होती. यावर्षी पहिल्यांदाच नदी दुथडी भरून वाहत असल्याने परिसरातील ग्रामस्थांनी नदीचा पूर पाहण्यासाठी गर्दी केली होती.