शहरात पाऊस, वारे नसताना वीज खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:30 AM2021-05-09T04:30:58+5:302021-05-09T04:30:58+5:30
विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर अनेकांनी फ्यूज कॉल सेंटरला दूरध्वनी केले असता, तो दूरध्वनी बंद होता. अन्य अभियंत्यांचे मोबाईलही लागत ...
विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर अनेकांनी फ्यूज कॉल सेंटरला दूरध्वनी केले असता, तो दूरध्वनी बंद होता. अन्य अभियंत्यांचे मोबाईलही लागत नव्हते. यामुळे ऐन उकाड्यात वारंवार वीज खंडित झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा वीजपुरवठा नेमका कुठल्या कारणामुळे खंडित झाला होता, याचे कारणही समजू शकले नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
नातेवाइकांसाठी मोफत पीपीई कीटची सुविधा
जालना : कोरोनामुळे आज अनेक रुग्ण हे विविध शासकीय तसेच खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. अशा रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाइकांना जायचे झाल्यास त्यांना पीपीई कीट परिधान करावे लागते. ही पीपीई कीट महाग मिळत आहे. त्यामुळे भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर यांनी पुढाकार घेत, गरजूंना या कीट मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याचा लाभ रुग्णांच्या नातेवाइकांना व्हावा म्हणून नातेवाइकांनी कपिल दहेकर यांच्याशी अथवा भाजपच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दहेकर यांनी स्वत: कीट घालून अनेक रुग्णांना डबे देण्यासह औषधी पुरविल्या आहेत.