वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मक्याचे पीक आडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:09+5:302021-07-19T04:20:09+5:30
भोकरदन : तालुक्यातील आलापूर परिसरात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मक्याचे पिके आडवे झाले आहे. ...
भोकरदन : तालुक्यातील आलापूर परिसरात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे मक्याचे पिके आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी भोकरदन शहरासह आलापूर, वाडी, प्रल्हादपूर, पेरजापूर, मलकापूर, मनापूर, फत्तेपूर, विरेगाव, आदी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या वाऱ्यामुळे मक्याचे पीक आडवे झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कृषी विभागाने नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे, अशी मागणी मलकापूर व आलापूर येथील शेतकरी नायब तळेकर, दादाराव तळेकर, शिवाजी तळेकर यांनी केली आहे.