राजेंद्रसिंह गौर यांना पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:36 AM2018-08-15T00:36:39+5:302018-08-15T00:37:28+5:30
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना पोलीस पदक जाहीर झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षामध्ये गौर व त्यांच्या पथकाने चोरी, दरोडा, खुन आदी श्रेत्रात यशस्वी तपास केल्याबद्दल त्यांना हे पोलीस पदक बहाल करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह २००३ मध्ये पोलीस कर्तव्य मेळाव्यात घातपात विरोधी तपासणीत चांगली कामगिरी करत गौर अव्वल राहिले होते. त्यांनी औरंगाबाद येथे दहशतवाद विरोधी पथकातही उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या एकूणच कर्तव्यदक्षतेची दखल हे पारितोषिक देताना घेण्यात आली. गौर यांनी यापूर्वी हिंगोली, जालना, लातूर जिल्ह्यातील किल्लारी यासह विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. जालना येथील कदीम जालना पोलीस ठाण्याला आयएसओ नामांकन प्राप्त करुन देताना देखील त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. गौर यांचे शिक्षण परभणी कृषी विद्यापीठात त्यांनी बीएससी अॅग्री पूर्ण केले आहे. नाशिक येथे पोलीस प्रशिक्षणा दरम्यान, त्यांनी द्वितीय क्रमांक मिळविला होता. पोलीस उपनिरीक्षक म्हणून ते पोलीस दलात रुजू झाले होते. हे पदक मिळाल्याबद्द्ल गौर यांचे पोलीस अधीक्षक एस. चैतन्य आणि अन्य मान्यवरांनी स्वागत केले आहे.