राजूरेश्वर जन्मसोहळा मंत्रोच्चारात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:18 AM2019-02-09T00:18:57+5:302019-02-09T00:19:27+5:30

मंत्राचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्याच्या मंगलवाद्यात मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर महागणपतीचा जन्मोत्सव सोहळा शुक्रवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

Rajurshwar jayanti celebrated in Rajur | राजूरेश्वर जन्मसोहळा मंत्रोच्चारात साजरा

राजूरेश्वर जन्मसोहळा मंत्रोच्चारात साजरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : मंत्राचा जयघोष, फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघड्याच्या मंगलवाद्यात मराठवाड्याचे आराध्य दैवत राजुरेश्वर महागणपतीचा जन्मोत्सव सोहळा शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तर कीर्तन व महाप्रसादाने हरिनाम सप्ताहाचा समारोप झाला.
जन्मसोहळ््यानिमित्त आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, तहसीलदार तथा संस्थानचे अध्यक्ष संतोष गोरड व स्थानिक विश्वस्तांच्या हस्ते मंत्रोच्चारात सकाळी ९ वाजता श्रीची महापूजा व अभिषेक करुन श्रीच्या मूर्तीस वस्त्रालंकार चढविण्यात आले. दुपारी १२ वाजता महाआरती करुन फटाक्यांची आतषबाजी व सनई चौघडयाच्या निनादाने साजरा झालेल्या श्री जन्म सोहळ््यातील अद्भुत शक्तीचा अवघ्या गणेश भक्तांनी अनुभव घेतला.
दरम्यान, गेल्या सप्ताहभरात मंदिराच्या पायथ्याशी सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाचा समारोप हभप. दयानंद महाराज सेलगावकर, आ.नारायण कुचे, भीमराव महाराज दळवी व सप्ताह समितीचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व सरला बेटचे महंत रामगिरी बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने करण्यात आला. समारोपांनतर १११ क्विंंटल अन्नदानाच्या महाप्रसादाचा लाखो गणेश भक्तांनी लाभ घेतला.
या सोहळ््यासाठी विश्वस्त साहेबराव भालेराव, सुधाकर दानवे, जि.प.सदस्य कैलास पुंगळे, सरपंच भाऊसाहेब भुजंग, माजी सरपंच शिवाजी पुंगळे, रामेश्वर सोनवणे, आशा साबळे, गणेश साबळे, विनोद डवले, बाबूराव खरात, प्रशांत दानवे, विष्णू राज्यकर, श्रीमंता पुंगळे, सरपंच अण्णासाहेब भालेराव, आत्माराम सुरडकर, संयोजक विष्णू महाराज सास्ते, शेषराव जायभाये, सखाराम काळे, जगन्नाथ थोटे, देवराव डवले, श्रीराम पंच पुंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी आ.नारायण कुचे, रामगिरी बाबा, के. आर. सोळंके यांनी मनोगत व्यक्त केले.
सोहळ््याच्या यशस्वितेसाठी भगवान नागवे, राहुल दरक, ज्ञानेश्वर पुंगळे, विनायक जगताप, मुकेश अग्रवाल, गजानन जामदार, मुसा सौदागर, एम. के. ठोंबरे, ए. व्ही. कड, आप्पासाहेब पुंगळे, रामेश्वर टोणपे, कृष्णा जाधव आदींनी परिश्रम घेतले.
या सोहळ््यास परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रात्री ९ वाजता टाळमृदंगाच्या गजरात राजुरेश्वर मंदिरातून श्रीची पालखी मिरवणुक काढण्यात आली. पालखीसमोर भजनी मंडळांनी भजने गायली. तर बँण्डच्या तालावर युवक गुलालाची मुक्त उधळण करीत गणरायाचा जयघोष करीत होते. पालखीसमोर भारूडाचे आयोजन करण्यात आल्याने मिरवणुकीत चांगलीच रंगत आली होती. महिलांनी घरासमोर सडासंमार्जन करून व रांगोळी काढून पंचारतीने ओवाळत श्रीचे मनोभावे दर्शन घेतले तर राजूरेश्वर गडाच्या पायथ्याशी भव्य शोभेचा दारूखाना उडविण्यात येऊन पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो भाविकांनी दारूखान्याच्या आतीषबाजीचा आनंद लुटला. आभार संयोजक विष्णू महाराज सास्ते यांनी मानले.
यावेळी सप्ताहात ज्ञानदान, अन्नदान व योगदान देणाऱ्या विविध संस्था व मान्यवरांचा सप्ताह समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. श्री जन्मोत्सव सोहळ््यानिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांनी सप्ताहभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. सोहळ््यात राज्यातील नामवंत संत महंतानी हजेरी लावून कीर्तन, प्रवचनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा, हुंडाबंदी, शैक्षणिक, स्वच्छता मोहीम समाजातील अनिष्ट परंपरेवर प्रहार करीत समाजप्रबोधन केले.

Web Title: Rajurshwar jayanti celebrated in Rajur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.