पोलीस बंदोबस्तात रक्षाविसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:45 AM2019-06-20T00:45:09+5:302019-06-20T00:45:27+5:30
बाभूळगाव येथील आत्महत्या केलेल्या विवाहित महिलाच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सुध्दा बुधवारी पोलीस बंदोबस्तात करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : बाभूळगाव येथील आत्महत्या केलेल्या विवाहित महिलाच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सुध्दा बुधवारी पोलीस बंदोबस्तात करण्यात आला आहे.
बाभूळगाव येथे दोन नाहीसा पूर्वी विवाह झालेल्या आम्रपाली बाबासाहेब काळे या विवाहितेने अंगावर रॉकेल घेऊन जाळून घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या माहेरच्यांनी अंत्यसंस्कार करते वेळी मोठा गोंधळ घातला होता. मयताच्या सासरच्या घरासमोरच सरण रचून आरोपींना पकडण्यासाठी तीन तास मृतदेह घरासमोर ठेवला होता. त्यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. मात्र, भोकरदन पोलिसांनी मयत विवाहितेच्या नातेवाईकांची समजूत काढून आरोपीना पकडण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे रात्री उशिरा आम्रपाली काळे हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. बुधवारी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होता. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात होता.
चारही आरोपींची कारागृहात रवानगी
या प्रकरणातील आरोपी बाबासाहेब काळे, प्रल्हाद नामदेव काळे, दुर्गाबाई प्रल्हाद काळे, राहुल प्रल्हाद काळे यांना पोलिसांनी अटक करून भोकरदन न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चारही आरोपींची जालना कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
लग्नातील साहित्य नेले परत
मयत आम्रपाली हिच्या लग्नात आंदण म्हणून दिलेले विविध साहित्य तिच्या नातेवाईकांनी परत नेले.