रमेश कदम जालना न्यायालयात हजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:25 AM2017-12-14T00:25:01+5:302017-12-14T00:25:14+5:30

जालना येथील अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. तथा अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.

Ramesh Kadam goes to Jalna's court! | रमेश कदम जालना न्यायालयात हजर!

रमेश कदम जालना न्यायालयात हजर!

googlenewsNext
ठळक मुद्दे२२ डिसेंबरला पुढील सुनावणी : साठे महामंडळातील घोटाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथील अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील ८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. तथा अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे.
अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातंर्गत बोगस लाभार्थी दाखवून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला होता. याप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष आ. रमेश कदमला अटक करण्यात आली. यापूर्वी ३ एप्रिल २०१६ रोजी जालना जिल्हा सत्र न्यायालयात रमेश कदम याला हजर करण्यात आले होते. ७ एप्रिलपर्यंंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वेदपाठक यांच्या न्यायालयात कदम याला बुधवारी सीआयडीच्या पथकाने हजर केले. सरकारी वकील न्यायालयाची दिशाभूल करीत असून, ही याचिका रद्द करण्याची मागणी रमेश कदम याने स्वत: युक्तीवाद करताना केली. त्यानंतर न्यायालयाने सरकारी वकीलांना आपले म्हणणे मांडण्यासाठी २२ डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे.

Web Title: Ramesh Kadam goes to Jalna's court!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.