दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2022 10:48 AM2022-05-05T10:48:57+5:302022-05-05T10:56:39+5:30

जालन्यात आयोजित परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंनी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करण्याची इच्छा व्यक्त केली.

Raosaheb Danve says, I want to see a Brahmin become the Chief Minister; Arjun Khotkar says, Uddhav Thackeray is Brahmin | दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत'

दानवे म्हणतात-'ब्राह्मणाला मुख्यमंत्री झाल्याचं पाहायचंय'; खोतकर म्हणतात-'उद्धव ठाकरे ब्राह्मण आहेत'

Next

जालना: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता परत एकदा त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. "मला एका ब्राह्णाला राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे," असे वक्तव्य दानवेंनी केले. 3 मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकरदेखील (Arjun Khotkar) उपस्थित होते.

जालन्यात ब्राह्मण समाजाकडून 3 मे रोजी भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी आयोजित कार्यक्रमात येत्या नगर परिषदेच्या निवडणुकीत ब्राह्मण समाजाच्या उमेदवारांना तिकीट देण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी परशुराम जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील किनगावकर यांनी केली. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, "ब्राह्मण समाजातील व्यक्तीला फक्त नगरसेवक, नगराध्यक्ष पदांवर पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मण समाजातील व्यक्तीला राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर पाहू इच्छितो,'' असे वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले. 

अर्जून खोतकरांचा टोला
दरम्यान, रावसाहेब दानवेंनी भाषणा ब्राह्मण समाजातील व्यक्तीले नेतृत्व देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांना शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी टोला लगावला. "आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील ब्राह्मण समाजातील आहेत. यापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, तेदेखील ब्राह्मण समाजातील आहेत. त्यामुळे, दानवेंनी ब्रह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करू म्हणण्याची भानगड सोडून द्यावी. आताचे मुख्यमंत्री तेच आहेत. देवेंद्र फडणवीस होतील तेव्हा होती. देवेंद्र फडणवीस माझे सर्वात जवळचे मित्र आहेत. त्यामुळे विद्वत्तेच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकतं," असं खोतकर म्हणाले.

Web Title: Raosaheb Danve says, I want to see a Brahmin become the Chief Minister; Arjun Khotkar says, Uddhav Thackeray is Brahmin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.