राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा जालन्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 12:20 AM2019-08-22T00:20:33+5:302019-08-22T00:20:52+5:30
दिल्ली येथील संत रविदास मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जालना : दिल्ली येथील संत रविदास मंदिर पाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जालना शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी दिल्ली येथील घटनेचा निषेध करीत आंदोलकांनी घोषणाबाजी केली. तसेच शासनाने जमीन परत करून तेथे संत रविदास यांचे भव्य मंदिर बांधावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष दुर्गेश कुरील, डी.एस.सोनवणे, अनिल शिलगे, अॅड. इंगळे, अॅड. आदमाने यांच्यासह महिला, नागरिक, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले. यावेळी कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिल्ली येथील घटनेच्या निषेधार्थ व मंदिर परत बांधून देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिपक डोके, कैलास रत्नपारखे, विष्णू खरात, अॅड. कैलास रत्नपारखे, विनोद दांडगे, सचिन कांबळे, नितीन लालझरे, गणेश शिंदे, आसाराम आहिरे, अजय गहिराव, रणजीत रत्नपारखे, गौतम निकम, आर्यन हिवाळे, किशोर गीतखणे, पवन गहिराव, ज्ञानेश्वर मासुळे, प्रशांत भागरे, कुणाल खिल्लारे आदी उपस्थित होते.