छिंदमवर कारवाईसाठी राजुरात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:17 AM2018-02-18T00:17:50+5:302018-02-18T00:17:55+5:30
राजूर : महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणा-या श्रीपाद छिंदम विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी राजूर येथे रास्ता रोको ...
राजूर : महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणा-या श्रीपाद छिंदम विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शनिवारी राजूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामुळे जालना-राजूर मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
अहमदनगर येथील श्रीपाद छिंंदम याने शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आॅडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठिकठिकाणी तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज राजूर येथे सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख कैलास पुंगळे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब पुंगळे, आकाश पुंगळे, गणेश पुंगळे, भगवान पुंगळे, गंगाधर पुंगळे, निवृत्ती पुंगळे, रवि पुंगळे, अनिल पुंगळे, संदीप मगरे, राहुल नावकर, विनोद पुंगळे, विशाल इंगळे, परमेश्वर कुमकर आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी जालना-भोकरदन रस्ता अडविल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वेळी जमादार प्रताप चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
गांधी चमनवर पुतळ्याचे दहन
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सकाळी अकरा वाजता गांधी चमन श्रीपाद छिंदम याच्या पुतळ्यास जोडे मारून आपला संताप व्यक्त केला. छिंदम याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे या वेळी दहन करण्यात आले. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडूळ, विष्णू पिवळ, नगरसेवक जयंत भोसले, अनिल मदन, सुनील देशमुख, अशोक भुतेकर, संतोष कºहाळे, महादेव टाळे, सीताराम मुजमुले, संतोष चाळसे, गणेश गुजर, करण जाधव, आशिष चव्हाण, बालाजी काटे, सुभाष चव्हाण, पाराजी गोरे, सूर्यकांत तौर, रवी सूर्यवंशी, विशाल गायकवाड, राजेश सूर्यवंशी, शुभम पवार, करण खांडेभराड, भागवत काळे, गणेश बरसाळे, प्रभाकर केदारे, विशाल तायडे आदींची उपस्थिती होती.