‘आधार’ असेल तरच रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:04 AM2018-01-18T00:04:02+5:302018-01-18T00:04:07+5:30

स्वस्त धान्य वितरणात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता केवळ आधार क्रमांक असणा-यांनाच ई-पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरित केले जात आहे.

Ration only if 'Aadhaar' is there | ‘आधार’ असेल तरच रेशन

‘आधार’ असेल तरच रेशन

googlenewsNext

जालना : स्वस्त धान्य वितरणात अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी आता केवळ आधार क्रमांक असणा-यांनाच ई-पॉस मशीनद्वारे स्वस्त धान्य वितरित केले जात आहे. जिल्ह्यात आधार पडताळणीद्वारे सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली (एनबिल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम-एईपीडीएस) लागू करण्यात आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना यापुढे आधार पडताळणीनंतरच धान्य वाटप करावे लागणार आहे.
स्वस्त धान्याचा लाभ थेट लाभार्थ्याला मिळावा, रेशनच्या काळ्या बाजाराला आळा बसावा यासाठी जिल्ह्यात एप्रिल २०१७ पासून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप पद्धत सुरू करण्यात आली आहे. गत सहा महिन्यांमध्ये ८५ टक्के धान्य वाटप याच पद्धतीने सुरू असून, आधार पडताळणीचे प्रमाण ६० टक्यांहून अधिक आहे. आॅनलाईन पद्धतीने आधार पडताळणीद्वारे धान्य वाटपात जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर असल्याने अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्ह्यात एईपीडीएस प्रणालीद्वारे धान्य वाटपाचे निर्देश पुरवठा विभागाला दिले आहेत. जिल्ह्यात एकूण तीन लाख २६ हजार रेशनकार्डधारक असून आधार सीडिंगचे ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या रेशनकार्ड धारकांना या पुढे आधार क्रमांक असेल तरच स्वस्त धान्याचे वाटप केले जाणार आहे. लाभार्र्थ्याना ई-पॉस मशीनवर आधार अद्ययावत करता येणार आहे. ज्या कुटुंबप्रमुखाकडे आधार क्रमांक उपलब्ध नसेल त्यांनी कुटुंबातील सदस्याचा आधार क्रमांक ई-पॉसमध्ये अपडेट करावा. अपवादात्मक परिस्थितीमध्ये आधार पडताळणी न झाल्यास धान्य वाटपासाठी नियुक्त अधिका-यांच्या परवानगीने लाभार्थ्यास धान्य वाटप केले जाणार आहे. आधार पडताळणी न करता धान्य वाटप केल्यास किंवा अन्य काही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित क्षेत्र अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदारावर कारवाई केली जाणार आहे.
---------
जिल्हा पुरवठा विभाग स्वस्त धान्य वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. या पुढे रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्य आणण्यासाठी जाताना आधारकार्ड सोबत घेऊन जावे लागणार आहे.
राजू नंदकर, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: Ration only if 'Aadhaar' is there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.