राऊत यांना मराठासमाज भूषण पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:53 AM2018-07-29T00:53:59+5:302018-07-29T00:54:51+5:30
उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याबद्दल राजेश राऊत व गोलापांगरीचे ग्रा.पं.सदस्य रामप्रसाद कावळे यांना मराठा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मोर्चातील तरूणांचा राजकारण्यांवर असलेला रोष सहन झाला नाही, म्हणूनच पदाचा राजीनामा दिला. केवळ प्रसिध्दीसाठी नव्हे तर समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊनच दिला आहे. यापुढे मराठा आरक्षण आंदोलनात समाज घटक म्हणून हिरीरीने सहभागी होणार असून, समाजासाठी राजकारण सोडू, असे प्रतिपादन राजेश राऊत यांनी केले. शनिवारी आयोजित मराठा समाज भूषण पुरस्कार प्रसंगी ते बोलत होते.
उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याबद्दल राजेश राऊत व गोलापांगरीचे ग्रा.पं.सदस्य रामप्रसाद कावळे यांना मराठा भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आर.आर.खडके, प्रशांत वाढेकर, नारायण गजर, रवींद्र गजर जगदाळे, अविनाश कव्हळे, कृष्णा पडुळ, संदीपान जाधव, दत्ता शिंदे, सुधीर खेडेकर, अनंता मदन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. राऊत म्हणाले, माझ्या राजीनाम्याने फार फरक पडणार नाही, याची जाणीव असून समाजामुळेच आपण आहोत समाजापेक्षा पद मोठे नाही. ही वेदना स्वस्थ बसू देत नव्हती. यामुळेच आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.