देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:34 AM2020-01-22T00:34:50+5:302020-01-22T00:35:40+5:30

शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले

Ravsaheb Tope Debate Competition Winner of Devgiri College | देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

देवगिरी महाविद्यालयास रावसाहेब टोपे वादविवाद स्पर्धेचे सांघिक विजेतेपद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिक्षणाने मानवी मूल्यांचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी कै. रावसाहेब टोपे मराठवाडा विभागीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी केले. मत्स्योदरी शिक्षण संस्था व अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्पर्धेचे उद्घाटक म्हणून पत्रकार संजय देशमुख, परीक्षक म्हणून डॉ.बा.आं. म. विद्यापीठाचे सदस्य डॉ. सदाशिव सरकटे, संत रामदास महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. राजेंद्र धाये, पत्रकार बाबासाहेब डोंगरे यांची उपस्थिती होती.
‘प्रचलित शिक्षण व्यवस्था मानवी मूल्यांचे जतन व संवर्धन करण्यास असमर्थ ठरत आहे’. या विषयानुसार पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण ११ महाविद्यालयाच्या संघांनी सहभाग नोंदविला. एम.पी. लॉ. कॉलेज येथील कल्याणी काकडे हिने प्रथम, देवगिरी महाविद्यालय औरंगाबादची विद्यार्थिनी श्रुती पाटील हिने व्दितीय क्रमांक तर बारवाले महाविद्यालयाची विद्या अंभोरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
यावेळी उपस्थितांचे स्वागत समितीप्रमुख प्रा. डॉ. कार्तिक गावंडे, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. रमेश भुतेकर, डॉ. संभाजी पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. कृष्णा कदम यांनी केले.
अनिता शिंदे हिने स्वागत गीत सादर केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. ज्ञानदेव नागवे, प्रा. संजय गायकवाड, डॉ. विलास वरखडे, प्रा. ज्ञानेश्वर कळकटे, प्रा. डॉ. काळे व डॉ. श्रीपत गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास डॉ.दादासाहेब गजहंस, डॉ. पंडित रानमाळ, डॉ. सीमा निकाळजे, डॉ. सुजाता देवरे, डॉ. शिवकुमार सोळुंके, डॉ. शांताराम रायपुरे, डॉ. तुकाराम गजर, प्रा.संभाजी पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

Web Title: Ravsaheb Tope Debate Competition Winner of Devgiri College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.