सायकलवारीने दोन दिवसांत ३२० किमी पार करत गाठले पंढरपूर; व्यापाऱ्याने दिला पर्यावरणाचा संदेश

By महेश गायकवाड  | Published: June 13, 2023 02:38 PM2023-06-13T14:38:22+5:302023-06-13T14:38:42+5:30

सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर ही ३२० किलोमीटरची सायकल वारी आयोजित करण्यात आली होती

Reached Pandharpur by cycling 320 km in two days; The businessman gave the message of environment | सायकलवारीने दोन दिवसांत ३२० किमी पार करत गाठले पंढरपूर; व्यापाऱ्याने दिला पर्यावरणाचा संदेश

सायकलवारीने दोन दिवसांत ३२० किमी पार करत गाठले पंढरपूर; व्यापाऱ्याने दिला पर्यावरणाचा संदेश

googlenewsNext

- नसीम शेख

टेंभुर्णी ( जालना) : जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील व्यावसायिक पंडित सुरशे यांनी दोन दिवसांत सायकलवर ३२० किलोमीटरचा प्रवास करून पंढरपूर गाठले. छत्रपती संभाजीनगर येथील सायकलिस्ट फाउंडेशनच्यावतीने छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर ही ३२० किलोमीटरची सायकल वारी आयोजित करण्यात आली होती. यात सुरशे हे टेंभुर्णी येथून सहभागी झाले होते. सुरशे यांनी मित्रांसोबत जालना ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवासही सायकलनेच पूर्ण केला. त्यामुळे त्यांनी जवळपास ३७५ किलोमीटरचा प्रवास सायकलवर पूर्ण केला.

पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदूषणरहीत पर्यावरणासाठी सायकलचा वापर वाढवणे काळाची गरज बनली आहे. हाच संदेश सांगत सुरशे व त्यांच्या संपूर्ण ग्रुपने ठीकठिकाणी सायकलीचे महत्त्व विशद केले. त्यांनी छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर हे ३२० कि.मी.चे अंतर अवघ्या दोन दिवसांत पूर्ण केले. आषाढी एकादशीपूर्वीच यानिमित्ताने विठुरायाचे दर्शन घडल्याने मनस्वी समाधानी असल्याचे सुरेश यांनी सांगितले. यावेळी आपल्या सोबत ७५ ते ८० वर्षाचे आजोबाही या रॅलीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

या सायकल वारीत जालना येथून धनसिंग बहुरे, प्रशांत भाले, मिलिंद खेरुडकर, अनिल मालपाणी, काशिनाथ मोरे, किशन जाधव आदी सहभागी झाले होते. दरम्यान, पंडित सुरशे हे सोमवारी टेंभुर्णीत परतल्यानंतर त्यांचा येथील मॉर्निंग ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. दीपक नागरे, डॉ. पवन वऱ्हाडे, डॉ. अविनाश सुरुशे, डॉ. रमेश मोठे, धीरज काबरा, मनीष सोमाणी, राजू करवंदे, सर्जेराव कुमकर, संदीप विसपुते आदींची उपस्थिती होती.

Web Title: Reached Pandharpur by cycling 320 km in two days; The businessman gave the message of environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.