वास्तव जीवनाची मांडणी म्हणजेच साहित्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:00 AM2018-01-14T00:00:04+5:302018-01-14T00:00:30+5:30
साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.
जाफराबाद : साहित्यात समाजकारण राजकारण बदलण्याची ताकद आहे. यासाठी साहित्याचे मोल महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन कथाकार भगवानराव देशमुख यांनी केले.
येथील समर्थ महाविद्यालयातील बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत शुक्रवारी आयोजित चौथ्या दोन दिवसीय झेप राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
साहित्य संमेलनाचे उद्घाटन खा. राबसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. या वेळी स्वागताध्यक्षपदी शिवसिंग गौतम, डॉ.संजीवनी तडेगावकर, डी.एन.जाधव, पंडितराव तडेगावकर, सिल्लोड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, सुधीर पाटील, प्राचार्य निवृत्ती दिवटे, मधुकर पडघन, नगरसेवक वसीम जहागीरदार, प्राचार्य संजय गौतम यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशमुख म्हणाले, की यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणातून साहित्याची निर्मिती केली. याचे खरे श्रेय चव्हाण यांना जाते.
शनिवारी समारोप प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया मान्यवरांना कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतिदिना निमित्त गौरविण्यात आले. दोन दिवसीय साहित्य संमेलनात कवितांची मेजवानी, लोककलावंतांचा लोकोत्सव, जनजागरण ग्रंथ दिंडी, प्रकट मुलाखत, परिसंवाद, कविसंमेलन इ. कार्यक्रम उत्साहात पार पडले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. विजय पाटील, प्रा.रंगनाथ खेडेकर यांनी केले. आभार गजानन उदावंत यांनी मानले.
------------
राजकारण्यांवरही साहित्यनिर्मिती व्हावी- दानवे
राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºयांवर सुद्धा साहित्य निर्मिती होऊ शकते यासाठी पुढाकार घ्यायला हवा. वास्तव जीवनाची मांडणी म्हणजे साहित्य आहे. साहित्यिकांनी मांडणी केलेले विचार रसिकांना आवडतात. मात्र ते आचरणात आणता आले पाहिजे असे रावसाहेब दानवे म्हणाले.