कर्जमाफीसाठी ४५५ कोटी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:05 AM2017-12-08T00:05:16+5:302017-12-08T00:05:30+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे.

Receipt of 455 crore for debt waiver | कर्जमाफीसाठी ४५५ कोटी प्राप्त

कर्जमाफीसाठी ४५५ कोटी प्राप्त

googlenewsNext
ठळक मुद्देजालना : लाभार्थींना रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू

जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून जिल्ह्याला ४५५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आलेला निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे वर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या ७० हजार ११८ पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. तशा आशयाचा संदेशही बँकांकडून लाभार्थ्यांना पाठवला जात आहे. लाभार्थी शेतकºयांचा आकडा वाढणार असून, त्या प्रमाणात निधीही बँकांना मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यशासनाने पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ देण्यास सुरुवात केली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख पंधरा हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले होते. अर्ज भरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तयार करून त्याचे चावडी वाचन पूर्ण करण्यात आले. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतकºयांची संपूर्ण माहिती आॅनलाइन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन लाख १२ हजार शेतकºयांची माहिती महा वेबपोर्टलवर भरली आहे. आॅनलाइन भरलेले अर्ज आणि बँकांनी कर्जदार शेतकºयांची आॅनलाइन भरलेली माहिती याचे आधारकार्ड, खाते क्रमांक व अन्य माहितीच्या आधारे संगणकाद्वारे अ‍ॅटो पद्धतीने एकत्रिकरण करून संगणकाद्वारे सॉफ्टवेअरच्या साहाय्याने हिरवा, पिवळा आणि लाल अशा तीन याद्या तयार करण्यात आल्या. हिरव्या यादीत कर्जमाफीस तात्पुरते पात्र, पिवळ्या यादीत अर्ज भरताना कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित शेतकºयांची नावे, तर लाल यादीत कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतकºयांची नावे आहेत. याद्या अपडेट करताना बँक प्रशासनाचीही दमछाक झाली होती. प्रत्यक्षात महिनाभरात पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यात केली होती. कागदपत्रांची जमावजमव आणि आॅनलाईन अपग्रेडेशन यामुळे अडचणीत भर पडली. परिणामी दोन महिने या प्रक्रियेस लागले. आता कर्जमाफीची प्रक्रिया सुरु झाली असून, दोन टप्प्यांत राज्य शासनाने ४५५ कोटी २५ लाख रुपयांचा निधी थेट बँकांना दिला आहे. टप्प्याटप्प्याने पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जात आहे.

Web Title: Receipt of 455 crore for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.