कोविशिल्डचे २१ हजार तर कोव्हॅक्सिनचे ८ हजार डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:32 AM2021-07-30T04:32:14+5:302021-07-30T04:32:14+5:30
कोव्हॅक्सिनचे ८ हजार डोस प्राप्त झाले असून, त्यांचेही वाटप करण्यात आले आहे. २२ जूनपासून जिल्ह्यातील सर्व लसीकरण ...
कोव्हॅक्सिनचे ८ हजार डोस प्राप्त झाले असून, त्यांचेही वाटप करण्यात आले आहे. २२ जूनपासून जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना ५० टक्के स्पॉट नोंदणी करून लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. गरोदर माता व स्तनदा माता यांचे लसीकरणही जिल्ह्यात सुरू झाले आहे.
लसीपासून वंचित असलेले १८ वर्ष व अधिक वयोगटातील सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. लस घेतल्यानंतरही लाभार्थ्यांनी त्रिसूत्रीचा वापर करावा. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा आणि गर्दी करू नये, असे आवाहन आरोग्य विभगामार्फत करण्यात आले आहे.