जिल्ह्यासाठी एक लाख डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:32 AM2021-09-26T04:32:24+5:302021-09-26T04:32:24+5:30
विजय मुंडे जालना : ‘मिशन कवच कुंडल’अंतर्गत १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २ लाख ३८ हजार ५९८ ...
विजय मुंडे
जालना : ‘मिशन कवच कुंडल’अंतर्गत १५ ते २५ सप्टेंबर या कालावधीत तब्बल २ लाख ३८ हजार ५९८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. शासनाकडून जिल्हा प्रशासनास एक लाख डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘मिशन कवच कुंडल’अंतर्गत लसीकरण मोहिमेला पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या घटली असली तरी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी अनेक जण उत्सुक नव्हते. त्यामुळे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र वाघमारे, जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, लसीकरण अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांच्या संकल्पनेतून व आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, महसूल आदी विविध विभागांच्या सहकार्यातून जिल्ह्यात मिशन कवच कुंडल राबविले जात आहे. आजवर २ लाख ३८ हजार ५९८ जणांचे लसीकरण झाले आहे.
११ दिवसांमधील लसीकरण
दिनांकएकूण लसीकरण
१५ सप्टेंबर२६,१६१
१६ सप्टेंबर२४,३२६
१७ सप्टेंबर२१,९४६
१८ सप्टेंबर२७,३२९
१९ सप्टेंबर ०००६०
२० सप्टेंबर २२,७७८
२१ सप्टेंबर २२,७७८
२२ सप्टेंबर २७,५१८
२३ सप्टेंबर २५४३३
२४ सप्टेंबर १५८३०
२५ सप्टेंबर २४४३९
एकूण २३८५९८