जालन्यात कोविडशिल्डचे सहा हजार डोस प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:07+5:302021-07-18T04:22:07+5:30
कोव्हॅक्सिन लसीचे ११०० डोस प्राप्त झाले. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय जालना, पाणीवेस, रामनगर, नूतनवसाहत ...
कोव्हॅक्सिन लसीचे ११०० डोस प्राप्त झाले. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय जालना, पाणीवेस, रामनगर, नूतनवसाहत येथील केद्रांना वाटप करण्यात येत आहे.
२० जून २०२१ पासून जिल्ह्यातील सर्व कोविडशिल्ड लसीकरण केंद्राच्या ठिकाणी १८ ते ४४ वयोगटांतील लाभार्थ्यांना ५० टक्के ऑनलाइन व ५० टक्के स्पॉट नोंदणी करून लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे.
लसीपासून वंचित असलेले १८ वर्षे व अधिक वयोगटांतील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभाग होऊन लसीकरण करून घेणे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी नूतन वसाहत जालना येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.