दुष्काळावर मात करीत तुरीचे विक्रमी उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 01:05 AM2018-12-31T01:05:22+5:302018-12-31T01:08:30+5:30
दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती असतांना सुध्दा तुरीचे योग्य संगोपन केल्याने त्यांच्या शेतातील तुरीचे पीक चांगलेच बहरले आहे. यामुळे त्यांची तूर बघण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात पाहणीसाठी येत आहेत. बागल यांनी तुरीचे विक्रमी उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस फसत चालला आहे. नवनवीन प्रयोग करूनही दरवर्षी उत्पन्न मिळेलच याची शास्वती नाही, कधी कधी तर पेरणीचा खर्चही निघणे अवघड होत आहे. बदलत्या हवामानात नेमके कोणते पीक घ्यावे, हे शेतकºयांना कळेना, कारण कोणतेही पीक घेतले तरी, पाउस व बदलते हवामान यामुळे पीक पेरणी व लागवडीचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. मागील दोन तीन वर्षापासून तर शेतक-यांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी तर चक्क दुष्काळाचाच सामना करायचा आहे. अशा परिस्थितीत काही शेतकरी उमेद न हरता हाडाची काडे करून विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात, असेच परतूर शहरातील राजू उध्दवराव बागल हे शेतकरी मागील तीन वर्षापासून सातत्याने तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यातील विशेष म्हणजे या तुरीच्या पिकासाठी बागल हे कुठल्याही रासायनिक खते, अेोषधीचा वापर करत नाहीत. यामुळे तूर कीडमुक्त दिसून येत आहे.