‘समृद्धी’च्या मोबदल्यातून कर्जाची वसुली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:01 AM2017-12-04T00:01:13+5:302017-12-04T00:01:26+5:30
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
बाबासाहेब म्हस्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी जमीन दिलेल्या शेतकºयांचा शासनाने अप्रत्यक्षपणे खिसाच कापला आहे. ‘समृद्धी’साठी जालना आणि बदनापूर तालुक्यात संपादनाचे काम सुरू आहे. आतापर्यंत रस्ते विकास महामंडळाने १८५ शेतकºयांची ९३ हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, मोबदल्यातून कर्ज वसुली करीत बँकेच्या थकीत कर्जाची कपात करण्यात आली आहे. यामुळे समृद्धी बाधित शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
बदनापूर व जालना तालुक्यातील २५ गावांमधील एक हजार १५४ शेतकºयांची सुमारे साडेचारशे हेक्टर जमीन नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. यामध्ये जालना तालुक्यातील ७११, तर बदनापूर तालुक्यातील ४४२ शेतकºयांचा समावेश आहे. आतापर्यंत जालना तालुक्यातील अहंकार देळगाव, नंदापूर, थार या गावांमधील १०४ खरेदीखत पूर्ण झाले असून, ५१.९६ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले आहे.
बदनापूर तालुक्यातील नजिक पांगरी, गेवराई बाजार या गावामधील ८१ खरेदीखत पूर्ण झाले असून, त्यापोटी ४१.१३ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. दोन्ही तालुके मिळून ९६९ खरेदीखतांच्या माध्यमातून ३४७.१० हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे नियोजन आहे. आतापर्यंत झालेल्या खरेदी-विक्री प्रक्रियेत महामंडळाकडून शेतकºयांना सुमारे ३५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. मोबदला रक्कम थेट शेतकºयांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. समृद्धीसाठी जमीन विक्री केलेल्या बहुतांश शेतकºयांकडे राष्ट्रीयीकृत बँकेचे कृषी कर्ज असून, काही शेतकºयांनी दीर्घ मुदतीचे कर्जही घेतलेले आहे. समृद्धीचा मोबदला शेतकºयांना देताना बँकेचे थकीत कर्ज कपात करून उर्वरित रक्कम शेतकºयांच्या हातावर ठेवली जात आहे. त्यामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
कर्जमाफीच्या लाभाबाबत संभ्रम !
समृद्धी महामार्गात ज्या शेतकºयांची जमीन जात आहे. त्यातील बहुतांश शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र आहेत.
मात्र, काही शेतकºयांची जमीन समृद्धीसाठी खरेदी करतानाच बँकेचे पूर्ण कर्ज कपात करण्यात आले. कर्जमाफीचा लाभ मिळाल्यास या शेतकºयांना पैसे परत करू, असे सांगण्यात येत आहे. मात्र, एकदा बँकेचे कर्ज फेडल्यास परत कर्जमाफीचा लाभ मिळेला का, याबाबत शेतकºयांध्ये संभ्रम आहे.