खराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:58 AM2018-10-20T00:58:44+5:302018-10-20T00:59:37+5:30

प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.

Red-stricken due to bad roads | खराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी

खराब रस्त्यांमुळे लालपरी खिळखिळी

Next
ठळक मुद्देभूर्दंड : महिन्याला लाखो रुपयांचे नुकसान

दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीला मोठे अर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय दिवसेंदिवस खराब रस्त्यांवरील खड्ड्यांच्या संख्येत वाढ होतच असल्याने दिवसभरात चार ते पाच बसेसची दुरुस्ती करावी लागत आहे.
जालना शहरासह जिल्ह्यातील तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. काही रस्त्यांची अनेक वर्षापासून दुरुस्ती नसल्याने तर काही रस्त्यांचे काम थातूरमातूर झाल्याने रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. अपुरा निधी, निकृष्ट दर्जाची कामे त्यामुळे अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था कायम राहिली आहे. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
प्रवाशांसह, नागरिकांची ओरड होऊनही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच दिसून येत आहे. या रस्त्यांवरुन एसटी दैनंदिन प्रवास करत असल्याने लालपरीला मोठे नुकसान सोसावे लागते. बसस्थानकापासून खड्डे पडल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्यामुळे बस खराब होत आहेत. त्यामुळे प्रवाशी नाराजी व्यक्त करतात. जिल्ह्यातील अंबड, परतूर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने प्रवासाचे हाल होत आहेत.
विद्यार्थ्यांची गैरसोय
ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी बसनेच जातात. परंतु, खराब रस्ता असल्यामुळे परिवहन महामंडळ बस बंद करते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पायी किंवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांबरोबरच प्रवाशांचीही गैरसोय होते. दररोज ग्रामीण भागातून नागरिक शहराकडे येतात. परंतु, बस नसल्यामुळे नागरिकांचे हाल होतात. नाईलाजाने त्यांना खाजगी वाहनांना जास्तीचे पैसे मोजावे लागते.
बसस्थानकही होतय हायटेक
जालना शहरातील बसस्थानक हायटेक करण्यासाठी राज्य शासनाने ३ कोटींचा निधी दिला आहे. यामुळे येणाºया काळात जालना बसस्थाकाचे रुपडे पलटणार आहे. मात्र, बसस्थानकात येणाºया बसेसे या खिळखिळ््या असणार आहेत.
टायर होतात खराब
खराब रस्त्यावरुन प्रवासादरम्यान बस आदळून खिळखिळी होते. जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे टायर खराब होतात. त्यामुळे वारंवार टायर बदलावे लागते. तसेच कुठेही टायर खराब झाल्याने चालकांसह प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.
आजार उध्दभवतात
खराब रस्ता असल्यामुळे बस चालवत असलेले चालक व प्रवाशांना शाध्यांच्या आजारांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा गरोदर महिलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. तर वृध्दांना बसने प्रवास करतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

Web Title: Red-stricken due to bad roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.