नोंदणीकृत तूर उत्पादकांत संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:57 AM2018-07-12T00:57:21+5:302018-07-12T00:58:53+5:30
हमीभावाने तूर खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याची तहसील प्रशासनाकडून तपासणी न झाल्याने तब्बल तीन हजार शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतक-यात संताप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हमीभावाने तूर खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याची तहसील प्रशासनाकडून तपासणी न झाल्याने तब्बल तीन हजार शेतकरी अनुदानापासून वंचीत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतक-यात संताप आहे.
हमीभावाने तूर विक्रीसाठी जिल्ह्यातील आठ केंद्रावर तब्बल ८ हजार ७०० शेतक-यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. आधीच गेल्या वर्षीची तूर जिल्ह्यातील विविध गोदामात पडून असल्याने नाफेडने सुरुवातीपासून तूर खरेदी संथगतीने राबविली. त्यातच जागेचा अभाव आणि बारदाना नसल्याने अनेक वेळा खरेदी ठप्प झाली होती. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. खरेदी पूर्ण होईल की नाही, याची चिंता शेतक-यांना सतावत होती. व्यापारी धार्जिण्या प्रवृत्तीमुळे शेतक-यांची तूर खरेदी करण्यात शासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला होता. दोन टप्यात खरेदी करुनही तब्बल ३ हजार शेतक-यांची तूर बाकी आहे.