नियमीत आरोग्य तपासणी गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:24 AM2018-10-21T00:24:38+5:302018-10-21T00:25:20+5:30
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य असल्यास ते प्रगतीसाठी निश्चित मदत करते. आरोग्य तपासणी ही आता काळाची गरज झाली असून, त्यामुळे तुम्हाला नेमका कुठला आजार आहे आणि त्यावर कुठला इलाज करणे गरजेचे आहे. हे यातून स्पष्ट होते, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केल.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोलापांगरी : प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य असल्यास ते प्रगतीसाठी निश्चित मदत करते. आरोग्य तपासणी ही आता काळाची गरज झाली असून, त्यामुळे तुम्हाला नेमका कुठला आजार आहे आणि त्यावर कुठला इलाज करणे गरजेचे आहे. हे यातून स्पष्ट होते, असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केल.
जालना तालुक्यातील गोलापांगरी आयोजित मोफत रक्त तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ८ ते १८ वयोगटातील मुलांसह महिला आणि पुरुषांसाठी सी. बी. सी. टेस्ट आणि एच. बी. इलेक्ट्रोफोरेसीस तपासणी ,सिकल सेल, थलेसीयिया, हिमोफिलिया, थायरॉईडची यासह आदी तपासणी करण्यात आली.
यावेळी खोतकर म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला व पुरूष हे आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे अनेक गंभीर बऱ्याच उशीराने कळतात. तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे वेळीच तपासणी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या शिबिरात विद्यार्थीनी, बचत गटाच्या महिला आणि पुरुषांनी गर्दी केली होती.
यावेळी जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, संतोष मोहिते, डोंगरे, सरपंच सचिन मोरे, उपसरपंच द्वारकाबाई मोरे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य, बाबा मोरे, आर. एस. मोरे, जनार्धन मोरे, प्रल्हाद मोरे, ग्रामविकास अधिकारी अधिकारी के. के. खांडेकर, तलाठी गणेश खरात, सरपंच बाळू देवढे, सुदर्शन देवढे, विष्णू खरात, नारायण खडेकर यांची उपस्थिती होती.