शेडनेट, पॉलिहाऊससह मध्यम मुदतीचे कर्जही होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:08 AM2018-05-27T01:08:17+5:302018-05-27T01:08:17+5:30

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २००१ ते २०१६ या कालावधीत इमू पालन, पॉलिहाऊस, शेडनेटसाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्जही माफ केले जाणार आहे. तसेच योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांचे २००१ पासूनचे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे.

Relief from mid-term loan with ShedNet, a polyhouse | शेडनेट, पॉलिहाऊससह मध्यम मुदतीचे कर्जही होणार माफ

शेडनेट, पॉलिहाऊससह मध्यम मुदतीचे कर्जही होणार माफ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत २००१ ते २०१६ या कालावधीत इमू पालन, पॉलिहाऊस, शेडनेटसाठी घेतलेले मध्यम मुदतीचे कर्जही माफ केले जाणार आहे. तसेच योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून, आता शेतकऱ्यांचे २००१ पासूनचे थकीत कर्ज माफ केले जाणार आहे.
शासनाने कर्जमाफी योजनेची व्याप्ती वाढवली आहे. ज्या शेतक-यांना सभासदांना केंद्राच्या २००८ व राज्यशासनाच्या २००९ या वर्षाच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशांना १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीतील ३० जून २०१६ पर्यंत थकीत असलेल्या व ३१ जुलै २०१७ पर्यंत भरणा न केलेले कर्जमाफ केले जाणार आहे. पीककर्ज, पुनर्गठित, मध्यम मुदतीचे कर्ज तसेच एक एप्रिल २००१ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत वाटप केलेल्या इमू पालन, पॉलीहॉऊस व शेडनेट यासाठी घेतलेल्या मध्यम मुदतीच्या कर्ज प्रकरणांचाही माफीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
याचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी पाच जूनपर्यंत आपले सरकार पोर्टलवर आॅनलाईन अर्ज सादर करावे.
तसेच ज्या शेतक-यांनी कर्जमाफीसाठी यापूर्वी आॅनलाइन अर्ज भरला आहे. परंतु संपूर्ण कर्जाचा उल्लेख अर्जात केलेला नाही, अशा शेतक-यांनी त्याचबरोबर कर्जमाफीसाठी आतापर्यंत अर्ज न केलेल्या शेतक-यांनी पाच जूनपर्र्यंत अर्ज करावे. कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी दिली.

Web Title: Relief from mid-term loan with ShedNet, a polyhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.