शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:04 AM2019-06-10T00:04:39+5:302019-06-10T00:05:16+5:30

शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली.

Relieve the farmers with the help of Shiv Sena | शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा

शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा

Next
ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांची चारा छावणीला भेट : शेतकऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली.
रविवारी ठाकरे येणार म्हणून साळेगाव परिसरात मोठे उत्साही वातावरण होते. ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा साळेगावच्या प्रवेशव्दारावर येताच त्यांचे फटाके फोडून स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना शाखेच्या नामफलकाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम संपल्यावर उद्धव ठाकरे यांच्यासाठी एक सजवलेली बैलगाडी तयार ठेवली होती. परंतु ठाकरे यांनी त्यात बसणे टाळले. त्यांनी थेट चारा छावणीत जाऊन जनावरांना वैरण दिले. तसेच तेथील जनावरांच्या मालकांशी संवाद साधून मुबलक चारा, पाणी येथे मिळते काय, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांच्या चेहºयावरही एक प्रकारची चिंता आणि शेतकºयांबद्दल असलेला जिव्हाळा दिसून आला.
केवळ शेतक-यांसाठी ठाकरे हे विशेष विमानाने रविवारी सकाळी औरंगाबादला आले आणि नंतर हॅलिकॉप्टरने ते जालन्यात आले. शेतकºयांना मदत वाटपासाठी एखाद्या बड्या नेत्याने विमान आणि हॅलीकॉप्टरने येऊन जी मदत केली. त्याबद्दल उपस्थितांनी देखील त्यांचे तोंडभरून कौतुक केले. ठाकरे यांनी जालन्यात आल्यावर प्रथम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली.
पाणी वळवणे गरजेचे -जयदत्त क्षीरसागर
संपूर्ण मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नद्याचे पाणी नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्यात वळवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी मंत्री असताना त्याचा आराखडा तयार असून, त्याला जास्त निधीची गरज आहे.
हा निधी मिळाल्यास हा प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकेल. तसेच झाल्यास मराठवाड्यातील पाणी प्रश्न संपूर्णपणे निकाली निघेल असे प्रतिपादन माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
शिवसेनेची मदत
मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी आम्ही सरकार म्हणून पुढाकार घेत आहोत. परंतु केवळ सरकारी मदतीवर विसंबून न राहता, शेतकºयांना तातडीने मदत व्हावी या हेतूने आजचा हा कार्यक्रम खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्षात आणला आहे.
सेना शेतकºयांसाठी नेहमी धावून येते. सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी क्षीरसागर यांनी जो आराखडा सूचविला आहे, त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही तो मुद्दा मांडू, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Web Title: Relieve the farmers with the help of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.