रेमडेसिविर, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवा : टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:28 AM2021-04-13T04:28:35+5:302021-04-13T04:28:35+5:30
सोमवारी टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी टोपे यांनी अत्यंत लहान मुद्यांवर अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवून ...
सोमवारी टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी टोपे यांनी अत्यंत लहान मुद्यांवर अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवून घेऊन अडचणी जाणून घेतल्या. रूग्णांना चांगले उपचार देण्यासाठी लागणारे सर्व साहित्य कुठेही कमी पडता कामा नये असे सांगितले. विशेष करून रेमडेसिविरचा पुरवठा आणि वितरणावर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पथक नेमून लक्ष ठेवण्याचे सांगितले. खाटा वाढविण्याबाबत ही टोपे यांनी सूचना दिल्या. लसीकरणाचा जिल्ह्यात एक लाखांचा टप्पा पूर्ण आहे. परंतु तो अधिक गतीने वाढविण्याबाबत ही नियाेजन करण्याचे सांगितले. दरम्यान रविवारी देखील लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याचेही टोपे म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संतोष कडले, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
चौकट
१७ एप्रिलपासून लॉकडाऊनची शक्यता
राज्यात सर्वत्र एकाचवेळी लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊनचा निर्णय खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार आहेत. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण राज्यात १७ एप्रिलपासून १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.