विमा काढताय... सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:24 AM2018-10-10T00:24:56+5:302018-10-10T00:26:04+5:30

जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.

Removing insurance ... careful ..! | विमा काढताय... सावधान..!

विमा काढताय... सावधान..!

Next
ठळक मुद्देसायबर सेलने लक्ष द्यावे : उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची पोलिसांकडे पत्राव्दारे विनंती

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जळगाव, नाशिक, धुळे यासह अन्य जिल्ह्यांमध्ये वाहनांचा विमा काढताना काही अस्तित्वात नसलेल्या विमा कंपन्यांकडून तो काढण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या चुकीच्या विमा काढणाºयांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्यासह, पोलीसांनी देखील यात लक्ष घालण्याची विनंती उपप्रादेशिक अधिकाºयांनी एका पत्राव्दारे सायबर सेलकडे केली आहे.
केंद्र सरकारने आता वाहनांचा विमा उतरवतांना पुढील पाच वर्षाची रक्कम भरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेकांना ही बाब किचकट वाटत आहे. त्यामुळे यातून काही चुकीच्या व्यक्तींकडून इंटरनेटवरून नामांकित विमा कंपन्याचे बनावट लोगो तयार करून ग्राहकांना फसविण्याचे प्रकार पुढे येत आहेत. आतापर्यंत या प्रकरणांमध्ये कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.
या संदर्भात उपप्रादेशिक अधिकारी संजय मेहेत्रेवार आणि काळे यांनी जालना येथील सायबर सेलला या संदर्भात लेखी पत्र दिले आहे. अशा काही बनावट कंपन्या जालना जिल्ह्यात कार्यरत आहेत, काय हे त्यांनी तपासावे, अशी विनंती या पत्रात केली असल्याचे सांगण्यात आले. चुकीच्या पध्दतीने विमा काढण्यास कोणीच जबादार राहणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
जालना : दररोज हजारो वाहनांची होतेय नोंदणी
जालना जिल्ह्यात दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक अधिकाºयांच्या कार्यालयात होत असते. हे करत असताना आता पुढील पाचवर्ष कालावधीचा विमा भरावा लागणार आहे. त्यामुळे आॅनलाईन विमा भरताना त्यात काहीजण चुकीचे निकष लावून ग्राहकांची फसणूक करत आहेत. त्यामुळे विमा भरूनही जर एखादी दुर्घटना झाल्यास विमा कंपनीकडून मिळणारी आर्थिक नुकसान भरपााई मिळण्यास अडचणी येत येऊ शकतात. त्यामुळे सतर्क राहूनच विमा काढावा असे आवाहन केले आहे.
नागरिकांनी सतर्क राहहावे
ही गंभीर बाब लक्षात घेऊन वाहनधारकांनी त्यांच्या चारचाकी वाहन असो अथवा दुचाकी आॅनलाईन तसेच सायबर कॅफेमधून विमा काढण्याचे प्रयत्न न करता संबंधित विमा कंपनीच्या जिल्हा अथवा तालुका पातळीवरील अधिकृत कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाºयांशी संपर्क करूनच विमा काढावा असे आवाहनही उपप्रादेशिक अधिकारी महेत्रेवार यांनी केले आहे.

Web Title: Removing insurance ... careful ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.