जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:52 AM2019-04-21T00:52:18+5:302019-04-21T00:53:13+5:30

रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

Renovator Harvesting law on Jalna in the city of Jalna | जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच

जालना शहरात रेनवॉटर हार्वेस्टिंग कायदा कागदावरच

Next

गजानन वानखडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करता यावी यासाठी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवी यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम राबविले जातात. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी पातळी वाढविण्यासाठी मदत होते. ही बाब लक्षात घेता यासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचे या कायद्याकडे दुर्लक्ष असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला आहे. सलग चार वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. यामुळे पावसाचे पडलेले पाणी, जमिनीत जिरवून भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्यासाठी शासनाने रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात कायदा केला. याबाबत नागरिकामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सुचना नगरपालिका प्रशासनाला दिलेल्या आहेत. हार्वेस्टिंग केल्याशिवाय बांधकामास परवानगी देऊ नये अशा नगरविकास खात्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र, या चांगल्या उपक्रमाविषयी नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. वाहून जाणाऱ्या पाण्याच पुनर्भरण होत नसल्याने शहरातील जुन्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत.
कूपनलिकांचे पाणी खोलवर गेल्याने नागरिकांच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. साडेतीन लाखापेक्षा जास्त शहराची लोकसंख्या आहे. नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणारा निजामकालीन घाणेवाडी जलाशय कोरडाठाक पडला आहे. तर जायकवाडी धरणातून नवीन शहरासाठी येणारे पाणी सुध्दा पंधरा दिवसानंतर एकदा येते. पाण्याविना नागरिकांचे हाल होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील विविध भागात पाण्याची टंचाई निर्माण होते.
ही विपरीत परिस्थिती बदलण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी एक पर्याय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा, रस्त्यांमध्ये पाणी तुंबू लागते. नाले भरून वाहू लागतात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. रस्त्यांमध्ये वाहणारे हे पाणी जर रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने साठविले गेले तर पाण्याचे दुर्भिक्ष्य नक्कीच कमी होईल.
जलनपुनर्भरणामुळे होणारे फायदे
योग्य प्रकारे जलसंधारण आणि नियोजन केल्यास, पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतांवर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते.तसेच जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते. जमिनीखालील पाण्याची पातळी वाढल्यामुळे, पाणी वर खेचण्यासाठी लागणा-या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीमध्ये जिरविले गेलेले पाणी शेतीच्या कामी वापरले जाऊ शकते. विशेषत: कमी पाऊस झाल्यास, किंवा ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी ह्या साठविलेल्या पाण्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच गुरांना, जनावरांना पाजण्यासाठी देखील हे पाणी वापरले जाऊ शकते. जसजशी लोकसंख्या वाढत आहे, तसतशी पाण्याची मागणी देखील वाढत आहे. म्हणूनच अनेक ठिकाणी रहिवासी भागांमध्ये पाण्याची गरज भागविण्याकरिता बोअरवेल्स खणल्या जात आहेत. परिणामी, जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. जर पावसाचे पाणी जमिनीखाली जिरवणे गरजेचे आहे.

Web Title: Renovator Harvesting law on Jalna in the city of Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.