प्रख्यात उद्योगपती बद्रीनारायण बारवाले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 07:46 PM2017-07-24T19:46:38+5:302017-07-24T19:46:38+5:30
महिको बियाणे कंपनीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचे मुंबईत सोमवारी निधन झाले.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
जालना, दि. 24 - बियाणे उद्योगात जालन्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे तथा महिको बियाणे कंपनीचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉ. बद्रीनारायण रामूलाल बारवाले यांचे मुंबईत सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पाच मुली, एक मुलगा, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांनी महिको कंपनीच्या माध्यमातून संकरीत बियाणे निर्मिती करुन कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
सात दशकांपेक्षा अधिक काळ ते सक्रिय होते. गत आठवड्यात त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती. प्रकृती ठीक नसल्याने सोमवारी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. घरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना रूग्णवाहिकेतून घरी नेण्यात येत असतानाच दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री किताबसह अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांनी गौरविण्यात आले आहे. गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल नवी दिल्लीत त्यांना पुरस्कार देऊन गौरविले होते.