पाच दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर जलवाहिनची दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:24+5:302021-01-20T04:31:24+5:30
चौकट आ. गोरंट्याल यांनी रुग्णालयातून सूत्रे हलविली जालना ते पैठण ही जलवाहिनी व्हावी यासाठी परिश्रम घेतलेले आ. कैलास ...
चौकट
आ. गोरंट्याल यांनी रुग्णालयातून सूत्रे हलविली
जालना ते पैठण ही जलवाहिनी व्हावी यासाठी परिश्रम घेतलेले आ. कैलास गोरंट्याल हे सध्या गुडघ्यावरील शस्त्रक्रियेसाठी मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. असे असतानादेखील त्यांनी मोबाइलवरून संपर्क साधून अंबडचे तहसीलदार, तसेच पैठण येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे यंत्रणा हलली.
चौकट
२१ नंतर पाणीपुरवठा सुरळीत
जुना जालना भागाला करण्यात येणारा पाणीपुरवठा पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मोठी अडचण येत आहे. ही अडचण साधारपणे २१ जानेवारीनंतर दूर होणार आहे. ही जलवाहिनी जरी दुरुस्त झाली असली तरी अनेक व्हॉल्व्हचे काम करणे अद्याप शिल्लक असून, तेदेखील काम हाती घेणार असल्याचे सांगण्यात आले.