मळणीयंत्र सुरु असताना दुरुस्ती करणे ठरले जीवघेणे; चालकाचे शीर झाले धडा वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 11:59 AM2022-10-03T11:59:11+5:302022-10-03T12:19:46+5:30

नशिबाचा खेळ, शेळ्या चोरीस गेल्यानंतर घेतले होते मळणीयंत्र 

Repairing the thresher while it was running proved fatal; The driver's head is different | मळणीयंत्र सुरु असताना दुरुस्ती करणे ठरले जीवघेणे; चालकाचे शीर झाले धडा वेगळे

मळणीयंत्र सुरु असताना दुरुस्ती करणे ठरले जीवघेणे; चालकाचे शीर झाले धडा वेगळे

googlenewsNext

- फकिरा देशमुख
भोकरदन (जालना):
तालुक्यातील लिंगेवाडी येथे मळणीयंत्रात अडकून चालकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. संदिप सुधाकर गाढे ( 35, बाभूळगाव) असे मृताचे नाव आहे. 

या बाबतची अधिक माहिती अशी की, सध्या खरीप हंगामातील सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू आहे. संदिप गाढेकडे मळणीयंत्र असल्याने त्यास शेतातील कामे मिळत. आज सकाळी 10 वाजेच्या दरम्यान गावालगत असलेल्या लिंगेवाडी येथील सदाशिव साबळे यांच्या शेतात संदीप गेला होता.  सोयाबीन काढण्यासाठी मळणी यंत्र सुरु असताना त्यात तांत्रिक अडचण आली. पान्हा घेऊन दुरुस्ती करत असताना तोल गेल्याने संदीप मळणी यंत्रात ओढला गेला. 

हे पाहताच काहीजणांनी मळणीयंत्र बंद केले. मात्र, तोपर्यंत संदीपचा मृत्यू झाला होता. संदीपचे शीर धडा वेगळे झाल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. दरम्यान, माहिती मिळताच सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी घटनास्थळी पोलिस कर्मचारी पाठविले. संदिपचा मळणीयंत्रात अडकलेला मृतदेह काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

शेळ्या चोरीस गेल्यानंतर घेतले मळणीयंत्र 
संदिपने बाभूळगाव येथे शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय चांगला सुरू असताना चोरट्यानी पूर्ण शेळ्या चोरून नेल्या. यामुळे संदीपने मळणीयंत्र घेतले होते. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक लहान मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Repairing the thresher while it was running proved fatal; The driver's head is different

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.