जिल्ह्यात २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:39+5:302021-01-25T04:31:39+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर शनिवारीच २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर शनिवारीच २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ५७२ वर गेली असून, आजवर ३६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ०१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ९ जणांना कोरोनाची लागण झाली. मंठा तालुक्यातील बेलोरा १ तर परतूर तालुक्यातील दैठणातील एकास कोरोनाची बाधा झाली. अंबड शहरातील २ तर तालुक्यातील घुगर्डे हदगाव २, बोरी तांडा १, मंठपिंपळगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बदनापूर तालुक्यातील पठार देऊळगाव १ तर भोकरदन तालुक्यातील बावणे पांगरी येथील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.