जालन्यात ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह; बाधितांची संख्या ६२१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:34 PM2020-07-02T13:34:48+5:302020-07-02T13:35:58+5:30
आरोग्य प्रशासनाकडून बुधवारी १५६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
जालना : जिल्ह्यातील तब्बल ४० जणांचा अहवाल गुरूवारी सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. यात ३७ जण हे जालना शहरातील आहेत. तर एक देऊळगाव राजा येथील व दोन घनसावंगी येथील रूग्ण आहेत. जालना जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ६२१ वर गेली आहे.
रूग्णालय प्रशासनाकडून बुधवारी १५६ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरूवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार ४० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात शहरातील मजरवाडी येथील एक, दर्गावेस भागातील एक, मोदीखाना भागातील तीन, गणपती गल्लीतील एक, पोस्ट आॅफिस रोडवरील एक, बारव गल्लीतील एक, तलरेजा नगरमधील १५ जण, रूख्मिणीनगरमधील दोन, चौधरी नगर मधील एक, नाथबाबा गल्लीतील दोन, माळीनगर मधील एक, दु:खीनगर मधील एक, गवळी मोहल्ला भागातील एक, गुरूगोविंदसिंग नगर मधील एक, वसुंधरानगर मधील एक, बाळेश्वरनगर भागातील एक, इनकमटॅक्स कॉलनीतील एक, लक्ष्मीनारायणपुरा येथील एक, अग्रसेननगर मधील एकाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर देऊळगाव राजा येथील एक, घनसावंगी येथील दोन अशा अशा एकूण ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आजवर ६२१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून, त्यातील १८ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर ३६० जणांनी कोरोनावर मात केली आहे.