जिल्ह्यात ५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:21 AM2021-07-21T04:21:09+5:302021-07-21T04:21:09+5:30
जालना : जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारीच ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला ...
जालना : जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारीच ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बाधितांमध्ये जालना तालुक्यातील वडगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. मंठा तालुक्यातील निरंक, परतूर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील जळगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. अंबड तालुक्यातील झिर्पी येथील एकास कोरोनाची लागण झाली. बदनापूर तालुक्यातील निरंक, जाफराबाद तालुक्यातील निरंक, भोकरदन तालुक्यातील देऊळगाव १, जानेफळ येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने मंगळवारी जिल्ह्यातील १५१४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या संख्या ६१ हजार ३६० वर गेली आहे. त्यातील ११७६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर ६० हजार १३० जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ५४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील काहींवर रुग्णालयात तर काहींवर अलगीकरणात उपचार सुरू आहेत.
नियमांचे पालन करा
जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यातील केवळ पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब दिलासादायक आहे. असे असले तरी नागरिकांनी मास्क वापरासह प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. शहरी, ग्रामीण भागातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी वाढत आहे. अनेकजण विनामास्क फिरत असून, सॅनिटायझर, सुरक्षित अंतराकडेही दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी मास्क वापरासह सूचनांचे पालन स्वयंस्फूर्तीने करणे गरजेचे आहे.