जिल्ह्यात ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:37+5:302021-07-28T04:31:37+5:30
जालना : जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या ४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात ...
जालना : जिल्ह्यातील पाच जणांचा कोरोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे, तर कोरोनामुक्त झालेल्या ४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मंगळवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मंठा तालुक्यातील निरंक, परतूर तालुक्यातील निरंक, घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव येथे दोघांना कोरोनाची बाधा झाली. अंबड तालुक्यातील वाळकेश्वर १, रुई येथील एकास कोरोनाची लागण झाली.
अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंबड येथील मुलींंच्या शासकीय वसतिगृहातील संस्थात्मक अलगीकरण कक्षात एकावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांची संख्या ६१ हजार ४०५वर गेली असून, त्यातील १,१७९ जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर ६० हजार १७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी नागरिकांनी प्रशासकीय सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.