९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:55+5:302021-01-16T04:35:55+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शुक्रवारीच ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर ...
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा शुक्रवारी मृत्यू झाला. शुक्रवारीच ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर यशस्वी उपचारानंतर ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ४४३ वर गेली असून, आजवर ३५९ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १२ हजार ८९९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील एकास कोरोनाची लागण झाली. बुलडाणा जिल्ह्यातील ३, तर परभणी जिल्ह्यातील एकास कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यात १९ हजार ५९३ संशयित आहेत. शुक्रवारी २४५ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २७८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संस्थात्मक अलगीकरणात दोघांना ठेवण्यात आले आहे.