कैकाडी समाजाचे राज्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:37 AM2018-09-29T00:37:52+5:302018-09-29T00:38:19+5:30
कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कैकाडी समाजाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात विशेष करून कैकाडी समाजाचा समावेश एससी प्रवर्गात करण्यासह त्यांच्यावर नाहक होणारी पोलीस कारवाई थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती राजेंद्र जाधव यांनी दिली.
दरम्यान काहीही झाले की, जालन्यातील पोलीस प्रथम आमच्या समाजाच्या लोकांवर कारवाई करतात. कुठलीही चौकशी न करता पोलिसांकडून ताब्यात घेतले जाते. विशेष म्हणजे कैकाडी समाजावर जर अन्याय झाला असेल आणि तो जर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेला तर त्यांची तक्रारही दाखल करून घेतली जात नाही, हा एक प्रकारे आमच्यावर अन्याय आणि अविश्वास दर्शविण्यासारखा आहे. ही परिस्थिती बदलून पोलिसांनी आमची तक्राही घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. गेल्या काही दिवसात आमच्या समाजानेही शहर आणि जिल्ह्याच्या विकासात हातभार लावलेला आहे. परंतु त्याची दखल घेतली जात नसल्याने आम्ही कधीच प्रकाश झोतात येत नाही, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.