संशोधन निर्मिती म्हणजे बौद्धिक स्वामित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:39 AM2018-12-07T00:39:42+5:302018-12-07T00:40:25+5:30
मानवाने जे संशोधन केले आहे. त्याच्या निर्मितीवर अधिकार सांगणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्व असल्याचे मत उप. प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे यांनी व्यक्त केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : मानवाने जे संशोधन केले आहे. त्याच्या निर्मितीवर अधिकार सांगणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्व असल्याचे मत उप. प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे यांनी व्यक्त केले आहे.
येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयात आयोजित एक दिवसीय बौद्धिक संपदा कायदा मराठी राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. भुजंग डावकर, डॉ. रामदास वैद्य, शिवराज लाखे, डॉ. सुनील खांडेभराड, डॉ. रामनाथ सांगुळे, डॉ. प्रबोधन कळंब, डॉ. रामलीला पवार, डॉ. जायदा शेख, डॉ. कल्पना विटोरे, डॉ. भगवान बैनाडे आदींची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले, व्यक्तीने संशोधन केल्यावर तिला कायदेशीर अधिकार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु, ते संशोधन दर्जेदार असणे त्यात नावीन्य असणे महत्वाचे आहे.
डॉ. प्रदीप जाधव यांनी सूत्रसंचालन केले. आर. आर. कांबळे यांनी आभार मानले.