आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:28 PM2024-08-06T17:28:29+5:302024-08-06T17:29:53+5:30

मराठा समाजाने एक दिवस हातातले काम सोडून शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे.

Reservation outcry is terrible, but what happened in Bangladesh will not happen in Maharashtra: Manoj Jarange | आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

आरक्षणाचा आक्रोश भयंकर, पण बांगलादेशमध्ये झालं ते महाराष्ट्रात होणार नाही: मनोज जरांगे

- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :
आरक्षणाचा विषय सरकारने समजून घेतला पाहिजे. हा विषय साधासुधा नाही, खूप भयानक वेदना आणि आक्रोश समाजात आहे. पण बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही. महाराष्ट्र सर्व जाती धर्माचा आहे. त्यामुळे इथे सर्व शांतता राहणार. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. मात्र, फडणवीसांच राज्यात दंगली घडवण्याचं षडयंत्र आहे, असा आरोप मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज केला. सोलापूर दौऱ्यावर जाण्या अगोदर जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

यावेळी जरांगे म्हणाले, मुद्दाम आपल्याला उचकवण्याचे काम राज्यात सुरू आहे  ते पण एक सरकारचा भाग आहेत अशी टिका मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे वर  केली.  मराठा समाजाला माजी विनंती आहे की आपल्या राज्यात कुठेही आंदोलन नाही त्यामुळे आंदोलन आपण करायचं नाही आपण संयम धरा असे आवाहन मराठा बांधवांना ही केले. हे सर्वजण स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी माझ्यावर तुटून पडलेत. हे त्यांचे षडयंत्र आहे. आपण त्याला विरोधातील अभियान म्हणू. मात्र, आपण संयम धरा. कोणाला अडवायची गरज नाही, कोणाविरोधात आंदोलन करायची गरज नाही, राज्यात कुठेही समाजाचे आंदोलन सुरू नाही. त्यामुळे कोणीही आंदोलन करू नका. ज्याला बराळायचा आहे त्याला बरळू द्या, असा टोला मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांना लगावला.

उद्यापासून सोलापूर येथून मराठा शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. मराठा समाजाने एक दिवस हातातले काम सोडून शांतता रॅलीमध्ये सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातला समाज ताकतीने एकत्र झाला आहे. सगळ्यात पक्षाच्या मराठा आमदारांनी समजून सांगणं आवश्यक आहे की आमच्या हक्काचं ओबीसीमधून आरक्षण आम्हाला द्या. सतेत्त जाण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आम्हाला नाव ठेवायचे नाहीत. तुम्ही राजकारणात गेलात म्हणून गोरगरिबांची लाट आली, सामान्यांची लाट आली सर्व जाती धर्माच्या लोकांना वाटत आहे की, ही एवढीच वेळ आहे सत्तेत जाण्याची राजकारण्यांना पायाखाली तुडवण्याची योग्य वेळ हीच आहे, असा इशारा जरांगे यांनी दिला. 

पश्चिम महाराष्ट्र नंतर विदर्भ आणि मुंबई, कोकणचा सुद्धा दौरा करणार आहे. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी कागदपत्र काढून ठेवा. लढायचं म्हटलं तर आपण तयारी असली पाहिजे. नाही म्हटलं तर मनस्थिती तयार करून ठेवा. यावेळी ताकतीने कार्यक्रम होणार आहे. १४ ते २० ऑगस्ट दरम्यान २८८ विधानसभेचा आढावा घेणार. २८८ मधील एससी एसटीच्या सुटलेल्या जागा आहेत त्याचाही विचार करणार. इतर छोट्या छोट्या जातीचे आमदार होण्याची सुद्धा या काळात दाट शक्यता आहे, खूप जागांवर विजय मिळू शकतो असे जरांगे म्हणाले. मराठ्यांना मुसलमानांना धनगरांना हे छेडायला लागले आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र खवळून उठला आहे. गोरगरिबांचा सुवर्णकाळ आला आहे. १२ वर्षातून जसा कुंभमेळा येतो तसा हा सुवर्ण काळ आलेला आहे. सामान्यांची लाट आहे. आपला अपक्षच बर आहे यांना सर्व लोक कदरलेले आहेत, आघाड्या नकोच, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांनी सगळे चोर, डाके टाकणारे गोळा केले आहेत. कोणतं मिशन राबवतात छत्रपती शिवरायांचा अरबी समुद्रातला पुतळा झाला का? दहा टक्के ईसीबीसी दिलं नसतं तर ईडयूएस गेलं नसत. ७ ते १३ दरम्यान रॅली निघणार आहे. या रॅलीत सहभागी होऊ नये असा कोणता नेता म्हंटल्यावर त्याचा हिशोब होणार. फडणवीस साहेब जे करत आहे ते चुकीचे करत आहेत. माझ्या विरोधात बोलायला लावलं जात आहे. मराठ्यांच्या आमदारांचा नाईलाज झाला आहे, त्यांना बोलायला भाग पाडला आहे. मराठीच मराठ्यांच्या अंगावर घालायला लावत आहेत. येवले वाला शांत बसला आहे याचा अर्थ फडणवीस यांनी शांत राहण्याचे सांगितलं आहे.पण फडणवीस मराठ्यांच्या विरोधात अभियान करून फसणार आहेत, असेही जरांगे म्हणाले. 

अनेक माजी आमदार संपर्कात 
पश्चिम महाराष्ट्रातला एक आमदार मला भेटला होता. २० वर्ष पक्षाचे काम करून न्याय मिळत नसल्याचे त्यांना म्हटलं होतं.माझ्याजवळ एका गाडीत सात सात उमेदवार आहेत. काही माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत. यांना कंटाळलेले लोक मला साथ देणार आहेत. कट्टर विरोधक सत्तेसाठी एकत्र आलेत, त्यामुळे जनता प्रचंड नाराज. आमच्यासोबत सगळ्या जातीचे लोक एकत्र येणार आहेत. २६ ऑगस्टला  लढायचा निर्णय झाला तर कागदपत्र काढून ठेवा, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे. 

Web Title: Reservation outcry is terrible, but what happened in Bangladesh will not happen in Maharashtra: Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.